Wednesday, May 8, 2019

हेमंतराव!! तुम्ही असं का करतात.

माझ्यामते तरी ट्विटरवरील एक चांगले मित्र, चांगले मुद्देसूद बोलणारे ( नेहमीच नाही.. दुसरं त्यांनी दुसऱ्याना हसण्यावारी घेण्याची कला अवगत केली आहे त्यापेक्षा क्रॉस चेक करण्यासाठी वेळ द्यायला हवा कारण त्यांच्याकडून हे अभिप्रेत आहे.) 

   मध्यंतरी त्यांच्यासोबत एक चर्चा झाली होती, त्यामध्ये मुख्य विषय नेमका वेगळा होता. पण हेमंतरावांनी त्या मुद्द्याला स्विंग देत विषय पंतप्रधान सैन्याला आदेश देऊच शकत नाही.. असं त्यांच्या बोलण्याचा सूर दिसत होता. तस त्यांनी त्यावर त्यांनी स्पष्टपणे मत मांडले नाही. मात्र नेहमीप्रमाणे त्यांनी शेलक्या भाषेत राज्यशस्त्राचा सल्ला दिला.. त्याबद्दल मला ही कुतूहल निर्माण की, आपण हेमंतरावांशी आपण चर्चा केली त्यावर आपलं मत मांडले पण हेमंतरावांनी पूर्ण मत न मांडता 'राज्यशास्त्र' विषय पुन्हा समजून घेण्याचा अभूतपूर्व सल्ला दिला. त्यावर नेहमीप्रमाणे काम केलं नाही.

    दुसऱ्यांंदा जेव्हा त्यांच्याशी चर्चा झाली ती चर्चा विस्तृतपणे चालत असताना त्यांनी शेवटी शेवटी मुद्देसूद चर्चेला वळण दिले, कारण त्यांनी मला पुन्हा सैन्याच्या बाबतीत पंतप्रधानांना अधिकार आहे का ? आणि राज्यशस्त्राचं पुस्तक वाचले तर बरं झालं असं सूचित केलं.. मात्र जेव्हा दुपारी चर्चा करीत असताना मला वाटलं होतच की, हेमंतराव पुन्हा तो माझा विक पॉईंट दाबतील.. झालं तेच, दुपारी त्यावर न बोलणारे शेवटी रात्री त्यामुद्यावर गेले. तेव्हा त्यांनी ट्विट्समध्ये उल्लेख केला की, सैन्य कधीपासून पंतप्रधानाच्या नियंत्रणाखाली आले?  नेहमी सारखं उत्तर दिले नाही तर म्हटलं की, तुम्ही True मांडणी करा. त्यानंतर मला जेवढं माहीत आहे त्याची मांडणी करतो. पण माझं मत त्यांना समजावं म्हणून त्याचं ट्विट्समध्ये एक वाक्य जोडलं 'राष्ट्रपती जरी तिन्ही सैन्य दलालांचे प्रमुख असले तरी पंतप्रधानाच्या सल्ल्याने काम करतात' उच्च दर्जाची चर्चा करायाची असेल तेव्हा एखाद्याला एखादी गोष्ट दुसऱ्याला माहीत नसेल तर ती दुसऱ्याने सांगणं अलिखित असते. पण तो पुढचाचा प्लस पॉईंट असेल तर मग हरकत नाही. तेव्हा त्यांनी परत गंभीर चर्चा करायची सोडून मुद्दा पुन्हा हसण्यावारी घेत स्वतःचा सत्य मुद्दा मांडण्याचे सोडून त्यांनी पुन्हा उलट प्रश्न केला तो असा – राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्याने काम करतात याचा एखादा पुरावा मिळेल का? त्यावर पुन्हा मी विषय मूळ मुद्द्यावर घेऊन जाऊ इच्छित होतो त्यामुळे पुन्हा प्रतिउत्तर म्हणून हे ट्विट्स केलं ― नाही आता सैन्याला आदेश देण्याबाबत तुमचं पुस्तक आणि विस्तृत मत मांडले तर बरं होईल. त्यानंतर मी माझे मत मांडतो. तुमच्या प्रतिक्रियेवरून वाटतंय की इंदिरा गांधींनी बांगलादेशांत सैन्य गुसवले नव्हते तर राष्ट्रपतीनी गुसवले होते. ( होऊ द्या चर्चा ) त्यावर परत त्यांनी कट्टर समर्थकासारखं किंवा माझा विक पॉईंट (त्यांच्यानुसार) दाबत पुन्हा ट्विट्स केलं – अरे दादा! आधी पुरावा दे मग पुढे चर्चा करू! नाहीतर चूक मान्य करा!! त्यावर मला माहिती असलेले दोन संदर्भ नमुद करत ट्विट्स केलं ते असं – मनी बिलच्या किंवा आर्थिक बजेट मांडताना पंतप्रधान राष्ट्रपतीना आधीच सूचना देतात की, यावेळच्या बजेटमध्ये कोणते मुद्दे अंतर्भूत असतील. त्या सूचनेनुसार राष्ट्रपती कार्य करतात. परदेशात करार केले तरी ते राष्ट्रपती च्या नावाने होतात पण करतो पंतप्रधान. कार्यकारी प्रमुख पंतप्रधान आहेत. त्यानंतर पुन्हा नेहमीप्रमाणे चर्चा सोडून गेले. हरकत नाही.

आता तुम्हाला मुद्दा समजला असेलच...

भारतीय राज्यघटना लष्काराला कोणत्याच परिस्थितीत सर्वाधिकार देत नाही. आणि असे सर्वाधिकार देण्याचाही अधिकार पंतप्रधान- राष्ट्रपतींना देत नाही. भारतीय लष्करावर नागरी नियंत्रण आहे हा नागरिकशास्त्राच्या पहिल्या धड्यातला मजकूर आहे. ( असंच हेमंतरावांना बोलायचे आहे असं गृहीत धरतो, कारण ते बोलतात ना ? सैन्य कधीपासून पंतप्रधानाच्या नियंत्रणाखाली आले?  तसही त्यांना माहिती असलेल्या माहितीची देवाणघेवाण करा म्हणजे विनंती केली होती )

सर्वप्रथम पंतप्रधान यांना काय अधिकार आहेत याबद्दल थोडंस त्यांच्या डोक्यात घालतो, देशांतर्गत, आंतरिक सुरक्षा,आणि सर्व बाजूच्या सीमा सुरक्षा देशाच्या गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येते त्यामुळं कश्मीर मध्ये जे काही पॅरॅमिल्ट्री फोर्स जे आहेत त्यांना सूचना हे केंद्रीय गृहमंत्रालाय देतो आणि त्यांना उत्तरदायित्व देखील केंद्रीय गृहमंत्रालाय आहे. पॅरॅमिल्ट्री फोर्स हे संरक्षण मंत्रालयाच्या अधीन येत नाही, गृहमंत्रालाय च त्या फोर्सेस ला उत्तरदायित्व आहे.

पैरामिलिट्री फोर्स मध्ये सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्योरिटी फ़ोर्स (CISF), सेंट्रल रिज़र्व पोलीस फ़ोर्स(CRPF), बॉर्डर सिक्योरिटी फ़ोर्स(BSF), इंडो तिबेट बॉर्डर पोलीस (ITBP) आणि सशत्र सीमा बल(SSB) हे ५ फोर्स एकत्र मिळून यांना सेंट्रल आर्म्ड पोलीस फ़ोर्स(CAPF) देखील म्हटले जाते. आणि या सर्व फोर्सेस ची तैनाती जम्मू आणि कश्मीर, आसाम, भारत चीन बॉर्डर, भारत बांगलादेश बॉर्डर सर्व ठिकाणी आहे. त्यामुळं यांना काय अकॅशन घेयची आहे ते देशाचे गृहमंत्रीच सांगू शकतात राष्ट्रपती नाही.

पंतप्रधान यांनी जे व्यक्तव्य केलं आहे सर्व जवानांना आम्ही सूट दिलेली आहे, जवानांना याचा अर्थ इंडियन आर्मी च होतो अस हेमंतराव यांना वाटत असेल तर त्यांना हे अति शिक्षण घेतल्यामुळे जाणवत आहे. सर्व बुद्धिजीवी ना बुद्धी असतेच असे नाही अतिबुद्धी असणारे पण असतात ना ?

हेमंतराव यांच असं म्हणणं आहे की थोडक्यात पंतप्रधान भारतीय सैन्याला आदेश देऊ शकत नाही कारण की त्या तिन्ही दलाचा प्रमुख हा राष्ट्रपती असतो. फक्त मोदीं ना कस टार्गेट करून आपला दिवस भरून काढण्याचा यामागचा हेतू असतो तुमचा त्याबद्दल तुम्हाला मी रोखू शकत नाही पण तुमच्या मुद्याचं खंडन जरूर करू शकतो. मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत त्या आधी १५ वर्षे मुख्यमंत्री होते राज्यघटना, राज्य कारभार काय असतो तुम्हाला जास्ती माहिती असेल पण त्यांना थोडं तरी माहिती असणार हे नक्कीच आहे.

मोदी हे तिन्ही सैन्याला आदेश देऊ शकत नाहीत हे मुद्दाच तुमचा चुकीच आहे. तुमचे सर्व प्रश्न मला मान्य आहेत पण; देशात एक संरक्षण मंत्रालय आहे आणि या मंत्रालयाच्या अधीन हे तिन्ही सैन्य दल येतात आणि या मंत्रालयाच्या आदेशावरून हे सैन्य कधीही, कुठेही कार्यवाहीकरण्यासाठी तयार असते आणि जर कुठे गरज पडली तर हे तिन्ही दल सरकारच्या आदेशावरून कुठेही कोणतीही मोहीम हाती घेऊ शकतात याला राष्ट्रपतीच्या आदेशाची गरज लागत नाही.

हेमंतराव पुलवामा ज्या दिवशी हल्ला झाला त्यात केंद्रीय सुरक्षा समितीची बैठक झाली त्यात देशाचा संरक्षण मंत्री उपस्थित होत्या, त्यानंतर दुसऱ्या दिवशी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यात गृहमंत्री, संरक्षण मंत्री, आय. बी , रॉ, राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीचे सर्व प्रमुख तसेच तिन्ही दलाचे सैन्य प्रमुख उपस्थितीत होते या बैठकीत जो निर्णय झाला आहे तो तिन्ही सैन्य दलाल सांगितला असणार यात शंका नाही कारण ज्या मंत्रालयाच्या अधीन हे तिन्ही सैन्यदल येतात त्या खात्याच्या मंत्री तिथे उपस्तीत होते इथे राष्ट्रपतींना बोलवलं जात नाही आणि राष्ट्रपती हे आदेश देणार नाहीत हे न समजण्या इतके तुम्ही बालिश नाही.

आता जाता जाता राज्य घटनेच्या त्या अनुच्छेद'चा उल्लेख करतो, कारण हा लेख संपवायचं ठरवलं त्या एका अनुच्छेदावर संपला असता पण काय आहे अति शिकलेल्या माणसांना सरळ साधं समजत नाही असा माझा वैयक्तिक अनुभव आहे त्यात तुम्ही अतिशिक्षित त्यामुळं एवढं लिहण्याच कष्ट घेतलं आहे. ( कारण फक्त तुम्हालाचं राज्यशास्त्राचा दीर्घ अभ्यास आहे.)

भारतीय राज्यघटना अनुच्छेद : ७४.१ नुसार राष्ट्रपती ला सल्ला देण्यासाठी एक मंत्रीपरिषद असते त्याचे अध्यक्ष देशाचे पंतप्रधान असतात त्यांच्या सल्ल्यानेच राष्ट्रपती हे काम करतात राष्ट्रपतीला एखाद्या सल्ल्याचा फेरविचार करण्यास सांगू शकतात घेऊ नका अस सांगू शकत नाहीत. ( मनी बिलच्या बाबतीत तर राष्ट्रपतीनी १४ दिवसात कायद्यावर स्वाक्षरी केली नाहीतर १५ व्या दिवशी त्या बिलाचे कायद्यात रूपांतर होते.)

तसेच भारतीय राज्यघटना अनुच्छेद ७४.२ नुसार मंत्रिमंडळाने दिलेला सल्लाची चौकशी अथवा त्याविरोधात न्यायलायत देखील जाता येत नाही म्हणून तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख हे जरी राष्ट्रपती असले तरी ते भारतीय राज्यघटनेनुसार नामधारीच आहेत त्यामुळं सर्व अधिकार मंत्रीपरिषदेलाच आहेत राष्ट्रपतीला नाही. हे थोडंस लक्षात घेतलं तर तुम्ही बरं होईल.

थोडक्यात घटनेत राष्ट्रपती सेनादलास सर्वोच्च असले तरी घटनेतील कलम ७४ नुसार प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाच्या प्रत्येक सल्ल्यानुसार निर्णय घेत असतात. राष्ट्रपतींवर तो प्रधानमंत्रीप्रणित मंत्रिमंडळाचा सल्ला बंधनकारक असतो. तसेच पंतप्रधानाच्या सल्ल्याशिवाय सेनादलास परस्पर आदेश देण्याचे अधिकारही राष्ट्रपतींजवळ नाहीत.

तुम्हाला हे माहीत आहेच पण तरी हेमंतराव!! तुम्ही असं का करतात.

( माझ्या लेखातील काही मुद्दे मांडले आहेत. यातील सर्वच मुद्दे तुम्ही तुमच्या लेखातून खोडू शकतात. मला आनंद होईल. )

Tuesday, August 14, 2018

आ चंद्र सूर्य नांदो.....



वैचारिक वादविवाद,राजकीय मते,विचारधारांतील अंतर आणि एखाद्या गोष्टीचे  'समर्थन' वा 'विरोध' या सर्वांच्या पलीकडे जाणारा आजचा दिवस. लाल किल्ल्याच्या पार्श्वभूमीवर किंवा अगदी आपापल्या ठिकाणी डौलाने फडकणारा 'तिरंगा' पहिला की एका उन्नत अभिमानाने मन भरून येते. मुळातच एका सहिष्णू संस्कृतीचे वारसदार असणारे आम्ही भारतीय, सत्तर वर्षांपूर्वी स्वीकारलेल्या लोकशाही शासन व्यवस्थेशी,आमच्या गुण-दोषांसकट तादात्म्य पावलो आणि म्हणता म्हणता चौफेर प्रगतीचे कितीतरी मोठे अंतर पार करून आलो ! 

राष्ट्रीय काँग्रेस मधील जहाल विचारसरणीने समाजसुधारणांचा मार्ग काही काळ रोखून धरला हे खरे पण शेकडो वर्षे दडपल्या गेलेल्या 'मूकनायकां'चा आवाज इतका प्रबळ होत गेला कि अखेरीस राजकीय आणि सामाजिक आंदोलन हातात हात घेऊनच उभे राहिले.  गांधीजींनी सामान्य माणसाला लढ्यासाठी उभे केले तर बाबासाहेबांनी देशाच्या मानवी संवेदनांना अक्षरशः प्रहार करून जागे केले. गांधींजींच्या प्रसंगी आदर्शवादाकडे जाणाऱ्या धोरणांना व्यवहाराची जोड दिली ती नेहरू-पटेलांनी. एकमेकांना चुकांची जाणीव करून देणारा पण तरीही देशाच्या ऐन कसोटीच्या क्षणी दोघांनाही एकदिलाने कार्यरत ठेवणारा त्यांच्यातील पत्रव्यवहार हा प्रगल्भतेची साक्ष आहे. पंडित नेहरू, होमी भाभा आणि विक्रम साराभाई यांच्या मैत्रीतून फुलले ते निखळ विज्ञाननिष्ठेचे स्वप्न. अहमदाबादच्या आऊटहाऊसमध्ये सुरु झालेली 'फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी' हा या स्वप्नाचा पहिला अविष्कार. त्यातूनच उभे राहिले ते भारतभरातील अनेक वैज्ञानिक संस्थांचे जाळे.आज 'इस्रो'च्या रूपात आकाराला आलेला अंतराळ संशोधनाचा महाकाय प्रकल्प हे याच विज्ञाननिष्ठेचे फलित आहे.

स्वराज्याच्या ऐन रणधुमाळीत दोन भारतीय वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या कारणांनी ब्रिटनमध्ये जातात आणि ब्रायटनच्या समुद्रकिनाऱ्याकडे आकर्षित होतात. परकीय भूमीवरचा तोच समुद्रकिनारा या दोघा 'साधकांना' दोन वेगळ्या तऱ्हांनी भावला. दोघेही मनस्वी कवी. प्रतिभावंत.रवींद्रनाथांनी 'मग्नलयी' ही निसर्ग बोलता करणारी अद्भुत कविता या सागराच्या सान्निध्यात लिहिली तर सावरकरांनी ब्रायटनच्या  याच समुद्राच्या सान्निध्यात 'ने मजसी ने..' हे  मातृभूमीचे विरहगीत लिहिले. दोन्ही कविता अजरामर ठरल्या. रवींद्रनाथांनी या प्रतिभेच्या बळावर देशाला शिक्षणसंपन्न करणारे शांतिनिकेतन उभारले तर सावरकरांनी क्रांतीच्या ज्वाला पेटवल्या. दोघांनीही आपापल्या गुणसुमनांनी देशाचीच सेवा केली. देशाची उभारणी झाली ती या अशा परस्पर पूरक कार्यानी आणि वरवर विरोधी वाटणाऱ्या तरीही सम्यक दिशेचा समतोल राखणाऱ्या विचारधारांनीही !

स्वातंत्र्य चळवळीला आकार देणाऱ्या या सर्वच लोकनेत्यांनी कदाचित परस्परविरोधी भूमिका घेतल्याही असतील, एकमेकांवर टीकाही केली असेल पण त्या भूमिकांना त्या त्या काळाचा संदर्भ होता. तो आता मागे पडला आहे. इतिहासाच्या या कालच उलटलेल्या पानावर आज ठसठशीतपणे दिसते आहे ते या सर्वांच्याच प्रयत्नांतून  स्वातंत्र्य चळवळीला मिळालेले अनोखे 'संतुलन' आणि त्यातूनच नेमकेपणाने  पुढे गेलेला चौफेर प्रगतीचा आमचा प्रवाह !

एका नकाशाच्या माध्यमातून दाखवता येण्याजोगा 'भारत' ब्रिटिशांनी उभा केला हे खरे आहे. इतिहासाच्या चक्रात बदलत राहणाऱ्या विविध 'शाह्यां'च्या किंवा 'साम्राज्या'च्या सीमा ब्रिटिश कालखंडात स्थिरावल्या आणि फाळणी होऊन एक मोठा भूभाग अखेरीस 'भारत' या नांवाने आपल्याला मिळाला हे ही खरे आहे पण 'खरे' त्याही पेक्षा अधिक काही आहे.

एका 'ठरावा'ने किंवा पेन्सिलीच्या रेघेने देश उभा राहत नसतो आणि 'राष्ट्र' असे एका रात्रीत जन्मही घेत नसते. मुळात एका समान संस्कृतीने बद्ध झालेला समाज,औपचारिक नामाभिधान नसले तरी स्वतःला 'भारतवर्षाचा'च भाग समजत होता. शेकडो बोलीभाषांमधून व्यक्त होणारी प्रतीके वेगळी असली तरी त्यामागचा भावार्थ मात्र एकच होता. कोणत्याही सलग रचनेचे हिस्सा नसलेले भाग बाहेरून विस्कळीत दिसत असले तरीही संस्कृतीच्या एका चिवट धाग्याने घट्ट जोडलेले होते.लोकशाही टिकली,वाढली आणि बहरली याचे कारण जगातील इतक्या मोठ्या बहुविधतेला सामावणारे एका समान 'राष्ट्रीयत्वा'चे भान येथे कायमच होते.

हे भान होते म्हणूनच या संस्कृतीमध्ये शिरलेल्या, माणसाला 'माणूसपण'च नाकारणाऱ्या अनेक प्रथा आपण अगदी स्वतःशीच संघर्ष करून नष्ट केल्या. तिला प्रवाही ठेवले.अशी प्रवाही संस्कृतीच राष्ट्राच्या एकत्वाचा कणा ठरू शकते. धार्मिक किंवा आर्थिक पायावर राष्ट्र असे उभे राहत नाही,काही काळ एकत्र राहिले तरी ते टिकत नाही. कारण तिथे नव्याचा स्वीकार नसतो आणि स्वार्थत्यागाची तयारीही नसते.

राष्ट्राच्या जडणघडणीमागचा हा सांस्कृतिक आधार, या जडणघडणीला आकार देणाऱ्या महापुरुषांचे योगदान,'संविधाना'च्या भक्कम पायावर उभे राहिलेले गणतंत्र, सामूहिक प्रगल्भतेच्या बळावर आम्ही गाठलेला प्रगतीचा टप्पा आणि विविधता जपूनही  बंधुत्वाने राहणारा विशाल जनसमुदाय हे आमचे अभिमानाचे बिंदू आहेत.

तिरंगी ध्वजाला प्रणाम करतांना या बिंदूंना सांधणारी एक सरळ रेघ मला डोळ्यांसमोर दिसते आणि द्वेष वा विरोधाचे सारे मळभ दूर सारून एका सकारात्मक ऊर्जेने मन भरून येते !

Sunday, June 3, 2018

पेट्रोल - डिझेल महाग का ? ( उत्तरार्ध)

              

                    पेट्रोलियम हे काळे सोने आहे हे काळे सोने सन्मान्य जनतेची कोंडी करीत आहे.त्याचबरोबर मोदी सरकारविरोधात जनमत तयार करण्यासाठी निर्णयाक भूमिका पार पाडत आहे.जागतिक बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किमतीत वाढ होत आहे,त्यामुळे भारतीय व्यापारी तुटसुद्धा वाढत आहे.तसे पाहता आपण सर्वच पेट्रोलियम पदार्थांचा वापर या ना त्या मार्गाने अनेक वर्षांपासून करतोय.आजच्या संदर्भात बोलायचं तर ते विकासासाठी आवश्यक साधन बनले आहे.पेट्रोलमध्ये राष्ट्र उभे करण्याचे तसेंच ते उलथवून टाकण्याचे बळ त्यात आले आहे.त्याच्या वापरावरचं तंत्रज्ञान पुढे पुढे चालले आहे.त्यावरील अवलंबित्व इतके वाढले आहे की,त्याच्या अभावातून युद्धे होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्याच्या अभावाने राष्ट्राची वाहतूक व्यवस्था कोलमडून शकते.इतर अनेक गोष्टींवर प्रभाव पडून देशाचा विकास हा त्यावर अवलंबून असल्याने त्याचा अभाव एखादया राष्ट्राला बुडवू शकतो.

                मृत जैविक सृष्टी लाव्हात सापडून ती पाण्यासह खडकात दाबल्यामुळे त्यातूनच पेट्रोलियमची निर्मिती होते.ही प्रक्रिया जमिनीच्या की समुद्राच्या तळाशी नैसर्गिकरित्या सुरू असते.पेट्रोलमधील घटक फ्राक्शनल डिस्टीलेशनच्या प्रक्रियेने वेगवेगळे करण्यात येतात.त्यातून मिळणाऱ्या पेट्रोलियमच्या एकूण उपलब्धतेनुसारच त्यांचे मूल्य ठरतं असते. तसेच स्थानिक मागणी आणि त्या त्या राष्ट्राच्या चलनाचा भक्कमपणा (आपला ₹ चा किती भक्कमपणे जागतिक स्तरावर उभा आहे हे माहीत आहेच ) आणि कराची आकारणी यावरच त्याची किंमतही ठरत असते.

                   पेट्रोलच्या दरवाढीमुळे राष्ट्रांचे अर्थकारण प्रभावित होणे ही चिंतेची बाब आहे. देशाची आर्थिक तूट भरून काढण्यासाठी अनेक राष्ट्रे पेट्रोलवर कर लावतात. महसूलापेक्षा खर्चात जेव्हा वाढ होते तेव्हाच आर्थिक तूट निर्माण होते पण ही आर्थिक तूट राष्ट्रासाठी सकारात्मक असते असे अनेकांना वाटते.आर्थिक मंदीवर मात करण्यासाठी आर्थिक तूट उपयोगी पडते असे मत अर्थतज्ज्ञ जॉन केन्स यांनी व्यक्त केले आहे पण प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांना मात्र अर्थसंकल्पात तूट कमीत कमी असायला हवी असे वाटतं असते.आपण गरजा निर्माण करतो आणि त्यामुळे होणारी आर्थिक तूट भरून काढण्यासाठी कर लावतो.हा प्रकार राष्ट्राने किती काळ सहन करीत राहावा ? त्यात चलनवाढीची भर पडली की ती विकासाला प्रभावित करते. तर दरडोई उत्पन्नही त्यामुळे प्रभावित होत असते


                तेलाचे अर्थकारण कमालीचे गुंतागुंतीचे झाले आहे. तेलाचा व्यापार जगभर सुरू असल्याने त्यांच्या किमती जगभर सारख्या असायला हव्यात. पण तशा त्या असतात का ?सध्या ती बॅरलला ८० अमेरिकन डॉलर इतकी आहे.ती किंमत गृहीत धरून वितरकाने ते ₹ ३६.२२ प्रति लिटर दराने विकायला हवे. पण बाकी सर्व राज्याचा कर आणि वितरकांचा नफा असतो


• पेट्रोलच्या किमती का वाढत आहेत ?

                  
                 जागतिक नाणेनिधीच्या अहवालानुसार कमी उत्पादन आणि राष्ट्रांची वाढीव मागणी त्यामुळे किमतीत वाढ झाली आहे.जगाचा GDP विकास,राष्ट्रा-राष्ट्रातील युद्धमान स्थिती ही सुद्धा तेलाच्या किमती प्रभावित करीत असते.२०१४ मध्ये आपले राष्ट्र निवडणूकांना सामोरे जात असताना सरकारने तेलाच्या किमतीत दोन रुपयांनी कपात केली होती.त्यामुळे वर्षभरात सरकारला ₹ २६००० कोटी उत्पन्नास मुकावे लागले होते. त्याचा अर्थ असा की पेट्रोलियम वरील ?₹१९.४८ अबकारी करामुळे सरकारच्या तिजोरीत ₹ २,५०,००० कोटी हे कराच्या रूपात जमा होत असतात ! २०१४ पासून आतापर्यंत डिझेलवरील अबकारी करात ४०० टक्के वाढ करण्यात आली आहे.२०१४ मध्ये लिटरमागे ₹ ३.५६ इतका अबकारी कर द्यावा लागत होता, तो सध्या ₹ १७.३३ प्रति लिटर इतका झाला आहे.पेट्रोलच्या बाबतीत अबकारी कराची वाढ १२७ टक्के आहे.गेल्या तीन वर्षात डिझेलवरील अबकारी कर हा चार वेळा दरवेळी ₹ २ प्रमाणे वाढविण्यात आला.ब्रॅण्डेड नसलेल्या पेट्रोलवरील अबकारी कर याच काळात किमान दहापट वाढविण्यात आला.त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारला मिळून ₹ ६,५०,००० कोटीचे उत्पन्न झाले.त्यातून जनतेला अनेक पायाभूत सुविधा मिळाल्या असल्या तरी गरजेच्या वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्याने सामान्य माणसावर बोजा वाढलाय. राज्य सरकारने दुष्काळी परिस्थितीतून बाहेर पडले असले तरी तीन रुपये प्रति लिटर दुष्काळी सेसची वसुली होतच आहे.हायवेवरील दारूची दुकाने बंद केल्यामुळे सरकारला जे नुकसान सोसावे लागत होते त्याची भरपाई अबकारी करात वाढ करून करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने या दुकानांना परवानगी दिल्यानंतरही अबकारी कर घेणे सुरूच आहे.पेट्रोलवरील कर हा उत्पन्नाचे साधन म्हणून किती प्रमाणात वाढवावा हा मुद्दा वादाचा असून त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.


                   या परिस्थितीला तोंड देण्यासाठी ऊर्जेचे पर्यायी साधन निर्माण करणे गरजेचे झाले आहे.सध्या सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा निर्मितीकडे ऊर्जा मंत्रालयाने लक्ष पुरविले आहे.अनेक ठिकाणी पवनचक्की आणि सोलर पॅनेल्सच्या माध्यमातून विजेचे उत्पादन होत आहे.भारतात अनेक ठिकाणी वर्षाचे ३०० दिवस सूर्यप्रकाश उपलब्ध असतो.सरकारने २०२२ सालापर्यत या दोन्ही साधनापासून १७५ गिगा वॅट इतकी वीज निर्मिती करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे.त्यासाठी देखील जमीन संपादन करावी लागणार आहे जे काम कटकटीचे असू शकते.
               
                     भारताचे अर्थकारण सध्या सुस्थितीत आहे.पण पेट्रोलच्या दरवाढीमुळे सामान्य माणसाच्या खर्चात वाढ झाली आहे. तेलासाठी भारताला तेल उत्पादक राष्ट्रांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत.त्याचा दबाव चालू खात्यांवर पडणारच आहे.भरीस भर अमेरिकेने व्याजदरात केलेली वृद्धी भारताच्या अर्थकारणाला प्रभावित करणार आहे. त्यात राजकारणाराला ही ओघानं आलंच,अशा परिस्थितीत सामान्य माणसाच्या गरजांच्या पूर्ततेसाठी मागणी आणि पुरवठा यांच्यात समतोल साधणे गरजेचे ठरणार आहे.

                      तीन महिन्यापूर्वी ₹६५.प्रति डॉलर असलेला दर आता ६८ रुपयांपर्यंत वाढला आहे.त्याचा आयातीवर विपरीत परिणाम होईल आणि विदेशात जाणाऱ्याना त्या प्रवासावर जास्तीचे पैसे मोजावे लागतील.पेट्रोल व डिझेल यांचे भाव तर त्यामुळे आणखीही उचवतील. हे संकट आजचे नाही.याआधीही अशी संकटे देशावर आली आहेत.त्यावेळच्या सरकारांनी त्यापासून जनतेला कसे संरक्षण दिले व तेलाच्या किमती आटोक्यात कशा ठेवल्या हेही आताच्या राज्यकर्त्यांनी पाहिले पाहिजे. तेलाचे उत्पादन करणारे मध्य आशियातील सारे देश आज अशांत व अस्वस्थ आहेत.त्यातले काही युद्धमग्न आहेत आणि काहींवर अमेरिकेचा बहिष्कार आहे.त्यामुळे तेलाचे उत्पादन कमी झाले असून हे संकट तूर्तास तरी संपण्याची शक्यता नाही.सबब यावर राष्ट्रीय स्वरूपाचेच उपाय आवश्यक आहेत.हवी तर त्यासाठी पूर्वीच्या तज्ञांची मदतीही घेणे गरजेचे आहे.


                 नशीब आणि पेट्रोलच्या किमती याबाबत Narendra Modi सरकारचं नशीब आटलेलं दिसतंय.बघता बघता पेट्रोल डिझेलच्या किमतींनी उच्चांक गाठला अर्थात या सगळ्याचा महागाईवर परिणाम होणार,यात काही शंकाच नाही. विरोध त्यांची भूमिका काटेकोरपणे पूर्ण करतील तसेच सरकारने त्यांनी त्यांचे कार्य पूर्ण करावे नाहीतर लवकरच देश २०१९ च्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे.ती विजयी शर्यत पूर्ण करण्यासाठी गाडीत पेट्रोल किंवा डिझेल भरलं जाणार नाहीतर त्यात मत भरली जाणार आहेत.या मताचा मुखभंग ! होणार नाही याची काळजी सरकारने घेतली नाहीतर त्यांचे दुर्दैवी परिणाम सरकारच्या ओंजळीत पडतील हे निश्चित.










Friday, May 25, 2018

पेट्रोल - डिझेल महाग का ? ( पूर्वार्ध )

    पेट्रोल,डिझेलच्या किमती आणि महागाई याचं भारतीय जनमानसात खूप जवळचं नात आहे.इंधनांचे दर वाढले,की भारतात महागाई खूप झाली आहे,अशी दृढभावना व्यक्त व्हायला Whatsapp / Twitter चं एक चांगलं उपलब्ध झालं आहे. ताबडतोब 'निषेधार्थ'चे खलिते फिरू लागतात. खरी तेलाची किंमत एवढी कमी असूनसुद्धा भारतात अवाच्या सव्वा भावानं तेल विकून जनतेची किती मुस्कटदाबी चालू आहे,असा सूर असतो. ही तळी उचलून धरायला सर्वच पक्ष उत्सुक असतात.(फक्त  कोणता पक्ष विरोधात आहे तोच रस्त्यावर दिसेल )

● जगातील बाजारात इंधनाचे दर कमी असताना भारतात ते कमी करण्यात आले नव्हते. कारण किमती खूप कमी केल्या तर जनसमुदाय काढून इंधनाचा वापर पाण्यासारखा होईल आणि देशावरील आर्थिक संकट आणखी भीषण होईल,याची जाणीव सर्वांच सरकारला ठेवावी लागते.●

    UPA सरकारच्या शेवटच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात तेलाचे भाव १०० डॉलर प्रति बॅरलच्या पल्याड होते.२०११ मध्येच 'अरब वसंत'सुरू झाला,(तेव्हा ते विरोधक याला मोदीचं नशीब म्हणत होते ) अर्थात त्याचा लवकरचं 'अरब ग्रीष्म' झाला आहे आणि तिथं विशेषतः लिबिया, इराक,सीरिया या देशांत निर्माण झालेल्या यादवीचा परिणामदेखील तेलाच्या भावावर झाला होता.पेट्रोलच्या किमती त्याआधी म्हणजे जून २०१० मध्ये सरकारने खुल्या केल्या होत्या आणि त्यामुळे पेट्रोलचे भाव चांगलेच वर गेले होते.डिझेलचे दर खुले करण्याचं राजकीय धैर्य सरकारकडे नव्हतं आणि त्यामुळे डिझेल दर खुले करायला २०१४ सालं उजाडलं.
    अर्थात Narendra Modi सरकार सत्तेवर आल्यावर तेलाचे दर जगाच्या बाजारपेठेत झपाट्यानं खाली आले आणि त्याचा फायदा उठवत सरकारनं पेट्रोलच्या बाबतीत तो निर्णय घेतला. याला काही करणं होती. डिझेल स्वस्त असल्यानं अनेक श्रीमंत मंडळींनी मोठमोठ्या गाड्या खरेदी केल्या होत्या आणि त्यावर अनाठायी दिलं जाणारं अनुदान वार्षिक १६,००० कोटी रुपये होतं. म्हणजे ज्यांना काही गरज नाही, अशा मंडळींचा भार सरकार उचलत होतं. त्याशिवाय तेलवितरण करणाऱ्या कंपन्या अतिशय आर्थिक अडचणीत सापडल्या होत्या.( ही माहिती त्याकाळात प्रसिद्ध झालेल्या Newspepar वरून घेतली ) ही सगळी परिस्थिती बदलण्यासाठी विद्यमान सरकारनं एक नामी उपाय योजला.(या उपयात कोणत्या अर्थविषयक जाणकारांने दिला माहीत नाही ) तेलाचे भाव झपाट्याने खाली आले आणि सहा महिन्यांतच अर्ध्यावर आले,तसतसे सरकारनं पेट्रोल-डिझेलवरचे कर वाढवायला सुरुवात केली.(केंद्र आणि राज्य दोन्ही आणि बीजेपी आणि गैरबीजेपी )
    केंद्र सरकारनं उत्पादनशुल्क आणि राज्यांची विक्रीकर वाढवले.अर्थातच प्रत्येक राज्यात वेगवेगळे आहेत आणि त्यामुळे देशाच्या वेगवेगळ्या भागात इंधनांच्या दरात आजही खूप तफावत आहे.दक्षिण कोकणातील गाड्यांना म्हणूनच गोव्यात जाऊन तेल भरणं अनेक वेळा स्वस्त पडतं (कर्नाटक मध्ये पण जातात असो ) एकाचं दगडात अनेक पक्षी साधले गेले.जनतेसाठी काही प्रमाणात किमती कमी झाल्या,पण जगातल्या किमती घसरल्या त्या मानाने पेट्रोल - डिझेलचे दर कमी करण्यात आले नाहीत.२०१६ च्या सुरवातीला तर भाव परत एकदा अर्धे होऊन २०-३० डॉलरच्या मध्ये येऊन पोहोचले, पण सरकारनं हीच नीती ठेऊन स्वतःची आणि राज्यांची वित्तीय तूट सारवली. तेलवितरण कंपन्यांची आर्थिक स्थिती देखील पटकन सुधारली.सामान्य लोकांना काही प्रमाणात सवलत मिळाली.२०१६ च्या सुरवातीला नीचांकानंतर तेलभाव हळूहळू वाढू लागले आणि २०१६ च्या नीचांकाच्या तुलनेत ते जवळजवळ तीनपट झाले.ओपेक सभासदांमध्ये अभावानं दिसणाऱ्या युतीचं दर्शन झालं २०१८ आणि २०१९ मध्येदेखील आम्ही उत्पादनावर मर्यादा ठेवू , अशी घोषणा त्यांनी केली आणि त्यांचा परिणाम तेलाचे भाव वाढण्यावर झाला,त्यात सैदी अरेबियाला गरजेचं आहे.अर्थात अमेरिकेतील शेल तेलामुळे आणि इतर पर्यायी तंत्रज्ञानाला प्रोत्साहन मिळू नये म्हणून तेलाचे भाव प्रचंड वाढणार नाहीत,याची दक्षता तेलउत्पादक देश घेतील.पण,या चढ्या भावाचा फटका भारतासारख्या मुख्यत्वे आयात करणाऱ्या देशाला बसतोच.( त्यामुळे तेव्हा ही माझं काँग्रेसला समर्थन होत कारण तेलाचे भाव आंतरराष्ट्रीय पातळीवर ठरतात )
    या दरम्यान सरकारनं पेट्रोल आणि डिझेलचे भाव रोज बदलायला तेलकंपन्यांना मुभा दिली आणि जगातील तेलभावांच्या हालचालींप्रमाणे पेट्रोल-डिझेलचे दर बदलू लागले.गेल्या पंधरवड्यात कर्नाटकातील राजकीय रणधुमाळीमुळे आगीत आणखी 'तेल'ओतलं नाही असेदेखील आरोप केला जातोय.( त्यातील सत्य माहीत नाही ) परंतु किमती जर खूप स्वस्त ठेवल्या तर जनमानसात ते पाण्यासारखं वापरून देशांवर मोठं संकट ओढवेल,याची जाणीव  सर्वच सरकारांना ठेवावी लागते.तेलभाव चढे असतील तरच माणसं वाहनं एकत्र जाणं, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणं वगैरें पर्याय वापरतील.म्हणूनच तेलावर अधिक कर हे संकट नसून वरदान आहे.हे लक्षात घ्यायला हवं आणि या संसाधनांचा आपापल्यापरीनं जपून वापर करायला हवा.अन्यथा, सवंग वापराचे परिणाम देशाला दीर्घकाळ भोगावे लागतील, यात शंका नाही ( या शेवटच्या वाक्यात विरोधकांनी मोदीला सत्तेतून काढलं नाही तर विरोधकांना त्यांचे परिणाम दीर्घकाळ भोगावे लागतील यात शंका नाही.पण तरी एक प्रश्न राहतो ज्या राज्यांत मोदी  सरकार आहे तिथे कर कमी होत नाही आहे त्यामुळे केंद्र सरकारच्या विषयी विरोधी वातावरण होईल पण जिथे मोदी सरकार सत्तेत नाही तिथे तरी राज्यसरकारने VAT कमी करून जनतेला दिलासा देण्यात काय हरकत आहे )
    अंतिमतः सर्वाना जनतेची दिशाभूल करायची आहे त्यासाठी इथे जाणीवपूर्वक Zee News वर इंधनदरवाढ विषयीं केलेल्या विश्लेषणाची link देत आहे नक्की बघावी संपूर्ण माहिती त्यात मिळेल उदाहरणार्थ केंद आणि राज्य शासनाने कसे करप्रणाली वापरली आहे.
👉 https://youtu.be/rg-tWCVOLQ8

तळटीप - मोदी आवडतं नाही तरी त्याला बघतात मग सुधीर चौधरीने काय विरोधक मारलं.आता पुढील भागात टीकात्मक विश्लेषण केले जाईल Promise !

© कार्टुनिस्ट - सतीश आचार्य